संपर्क :

📞 बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क : 9834502554 | ✉️ E-mail : janvedhnews3@gmail.com 🖇️Instagram : janvedhnews
Theme images by kelvinjay. Powered by Blogger.

मुख्य बातम्या

देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन

देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...

Breaking News

🔴 BREAKING NEWS 👉 जनवेध न्यूजमध्ये आपले स्वागत | ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या | बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8329354008 | ✉️ janvedhnews@gmail.com

Popular Posts

Lifestyle

Sports

Home » 🏷️ SEO Keywords Nanded News » Government सचेम्स » Maharashtra » जनवेध न्यूज » नांदेड बातम्या » महसूल » छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ३,४२९ नागरिकांनी घेतला विविध योजनांचा लाभ.

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ३,४२९ नागरिकांनी घेतला विविध योजनांचा लाभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कौठा येथील ओम गार्डनमध्ये आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात महसूल, पुरवठा, कृषी, आरोग्य, भूमी अभिलेख, महावितरण, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), उमेद अभियान, पशुसंवर्धन, पीएम स्वनिधी, पंचायत समिती, सायबर सेल, भरोसा सेल आदी अनेक विभागांनी सहभाग घेतला. शिबिरात एकूण ३,४२९ नागरिकांनी विविध विभागांच्या स्टॉलना भेट देत शासकीय योजनांची माहिती, मार्गदर्शन आणि विविध सेवांचा लाभ घेतला. जिवंत सातबारा, विविध प्रकारची प्रमाणपत्रे, रेशनकार्ड, शेतकरी प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू दाखले, तसेच लेक लाडकी, लखपती दीदी, प्रधानमंत्री मातृ वंदना, प्रधानमंत्री आवास, रमाई आवास, कृषी यांत्रिकीकरण, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, पीएम स्वनिधी यांसारख्या अनेक योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यात आला. यावेळी ८६० लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आला. महिला बचत गटांना कर्जवाटप, आरोग्य सेवा, कृषी योजनांचा लाभ, रेशनकार्ड वितरण, प्रमाणपत्रे, महावितरण आणि परिवहन विभागाच्या विविध योजनांचाही समावेश होता. शिबिरात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी यांच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ३,४१६ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच रक्तदान शिबिरालाही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी जपली. या कार्यक्रमाला बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील, महापौर कविता मुळे, आमदार आनंदराव बोंढारकर, उपमहापौर दीपकसिंग रावत, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच हजारो नागरिक उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड यांच्यासह महसूल, कृषी, ग्रामविकास, आरोग्य आणि इतर विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

«
Next
Newer Post
»
Previous
Older Post

No comments:

Leave a Reply