संपर्क :

📞 बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क : 9834502554 | ✉️ E-mail : janvedhnews3@gmail.com 🖇️Instagram : janvedhnews
Theme images by kelvinjay. Powered by Blogger.

मुख्य बातम्या

देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन

देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...

Breaking News

🔴 BREAKING NEWS 👉 जनवेध न्यूजमध्ये आपले स्वागत | ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या | बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8329354008 | ✉️ janvedhnews@gmail.com

Popular Posts

Lifestyle

Sports

Home » नांदेड बातम्या » महसूल » देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन

देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी, खराब रस्ता तसेच अपुऱ्या विद्युत प्रकाशव्यवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसचे देगलूर शहराध्यक्ष विकास नरबगे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी 10 सप्टेंबर रोजी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले. स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने दुर्गंधीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना नाकाला रुमाल बांधून जाण्याची वेळ येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सततच्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला असून, पालिका प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, देगलूर शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच ही स्मशानभूमी असल्याने या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने नागरिक व प्रवासी ये-जा करतात. स्मशानभूमी परिसरातील अस्वच्छता आणि दुर्गंधीचा सामना प्रवेश करणाऱ्या नागरिकांनाही करावा लागत असल्याने शहराच्या स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याशिवाय स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खराब झाला असून, अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी पुरेशी विद्युत प्रकाशव्यवस्था नसल्यामुळे सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत आहे. युवक काँग्रेसच्या प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे स्मशानभूमी परिसरातील साचलेला कचरा तातडीने हटवावा, नियमित स्वच्छता करावी, वाढलेले गवत व दुर्गंधी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करावी तसेच आवश्यक ठिकाणी विद्युत दिवे बसवावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. स्मशानभूमी परिसराची नियमित स्वच्छता व देखभालीसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणीही युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. प्रशासनाने सात दिवसांत आवश्यक कार्यवाही न केल्यास युवक काँग्रेसच्या वतीने नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. — देगलूर शहरातील नागरिकांच्या आरोग्य व मूलभूत सुविधांचा प्रश्न लक्षात घेता पालिका प्रशासन या मागण्यांवर कितपत तातडीने कार्यवाही करते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

«
Next
This is the most recent post.
»
Previous
Older Post

No comments:

Leave a Reply