तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष हरदीप सिंग गिल यांनी घेतले दर्शन
नांदेड (जिमाका), दि. 4 : राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष हरदीप सिंग गिल यांनी नांदेड दौऱ्यादरम्यान सुप्रसिद्ध तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले.
बाबा जीवनसिंग यांच्या जन्मदिवसानिमित्त अमृतसर येथून विशेष रेल्वेने नांदेडमध्ये आलेल्या संगतीसोबत श्री. गिल यांनी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारात माथा टेकून दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गुरुद्वारातील धार्मिक परंपरा व व्यवस्थेची माहितीही जाणून घेतली.
याप्रसंगी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष हरदीप सिंग गिल यांचा पारंपरिक पद्धतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी सुरेश लोट, सरदार अवतारसिंग पहरेदार आदी उपस्थित होते.




No comments: