संपर्क :

📞 बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क : 9834502554 | ✉️ E-mail : janvedhnews3@gmail.com 🖇️Instagram : janvedhnews
Theme images by kelvinjay. Powered by Blogger.

मुख्य बातम्या

देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन

देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...

Breaking News

🔴 BREAKING NEWS 👉 जनवेध न्यूजमध्ये आपले स्वागत | ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या | बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8329354008 | ✉️ janvedhnews@gmail.com

Popular Posts

Lifestyle

Sports

Home » Maharashtra » Marathi News » जनवेध न्यूज » रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

 रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ




नांदेड | प्रतिनिधी : 

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त नांदेड जिल्ह्यात रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते महात्मा फुले प्राथमिक व हायस्कूल, नांदेड येथे करण्यात आला. "सुरक्षित राहा – सर्वांसाठी रस्ता सुरक्षा" या संकल्पनेवर आधारित या अभियानाद्वारे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती निर्माण करण्यावर भर देण्यात आला.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी 18 वर्षांखालील मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, असे आवाहन पालकांना केले. अन्यथा संबंधित पालकांवर कायद्यानुसार कारवाई होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच रस्ते अपघात टाळण्यासाठी हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, मद्यप्राशन करून वाहन न चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी न वाहून नेणे, वाहतूक सिग्नल व इतर नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

नारायणा स्कूल येथे आयोजित कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी अजय शिंदे यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा नियमांचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी शक्यतो सायकलचा वापर करावा तसेच 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच वाहतूक नियमांची माहिती घेऊन वाहन चालवावे, असे आवाहन त्यांनी केले.

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त दि. 21 ते 28 जुलै या कालावधीत जिल्ह्यातील 28 शाळांमध्ये रिक्षाचालकांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये सुरक्षित वाहनचालना, वाहतूक नियमांचे पालन आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमास वाहतूक पोलीस उपनिरीक्षक श्री. मुंडे, अजयकुमार साखळे, सरदार जसपालसिंग, सेफर इंडियन रोड्सच्या सरचिटणीस श्रीमती अनमोल पंडीत, सदस्य महेश तिवारी, वरुण तिवारी, मीतल तिवारी तसेच विद्यार्थी, शिक्षक आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वाहतूक पोलीस विभाग तसेच सेफर इंडियन रोड्स अँटी करप्शन टीमचे घनश्याम ओझा यांनी विशेष सहकार्य केले.

«
Next
Newer Post
»
Previous
Older Post

No comments:

Leave a Reply