संपर्क :

📞 बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क : 9834502554 | ✉️ E-mail : janvedhnews3@gmail.com 🖇️Instagram : janvedhnews
Theme images by kelvinjay. Powered by Blogger.

मुख्य बातम्या

देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन

देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...

Breaking News

🔴 BREAKING NEWS 👉 जनवेध न्यूजमध्ये आपले स्वागत | ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या | बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8329354008 | ✉️ janvedhnews@gmail.com

Popular Posts

Lifestyle

Sports

Home » Maharashtra » नांदेड बातम्या » महसूल » *महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समिती दौऱ्याच्या पूर्वतयारीचा आढावा*

 *महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समिती दौऱ्याच्या पूर्वतयारीचा आढावा*



नांदेड, दि. 30 जुलै : महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचा नांदेड जिल्हा दौरा येत्या 10 ते 12 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदिप गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवन येथे बैठक संपन्न झाली.


बैठकीस किनवटचे सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी बी. सरवनन, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह महसूल, जिल्हा परिषद, पोलीस, मनपा, सार्वजनिक बांधकाम, कृषी, क्रीडा, महावितरण, जलसंपदा, वन विभाग, पुशसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क आदी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


अप्पर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदिप गायकवाड यांनी समितीच्या दौऱ्याचे स्वरूप, समितीचे अधिकार तसेच संबंधित विभागांनी आवश्यक माहिती व कार्यवाहीसह बैठकीस उपस्थित राहण्याबाबत मार्गदर्शन केले. निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनीही दौऱ्याच्या नियोजनासंदर्भात विविध बाबींवर उपयुक्त सूचना दिल्या.

00000

«
Next
Newer Post
»
Previous
Older Post

No comments:

Leave a Reply