संपर्क :

📞 बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क : 9834502554 | ✉️ E-mail : janvedhnews3@gmail.com 🖇️Instagram : janvedhnews
Theme images by kelvinjay. Powered by Blogger.

मुख्य बातम्या

देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन

देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...

Breaking News

🔴 BREAKING NEWS 👉 जनवेध न्यूजमध्ये आपले स्वागत | ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या | बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8329354008 | ✉️ janvedhnews@gmail.com

Popular Posts

Lifestyle

Sports

Home » नांदेड » नांदेड दक्षिण मतदारसंघात २२ जुलै रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत भव्य शिबिराचे आयोजन

नांदेड दक्षिण मतदारसंघात २२ जुलै रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत भव्य शिबिराचे आयोजन



नांदेड, दि. २० जुलै : माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या जन्मदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवार, २२ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजता ओम गार्डन, कोठा, नांदेड येथे नांदेड दक्षिण मतदारसंघासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराचे उद्घाटन नांदेड दक्षिणचे आमदार आनंद तिडके पाटील बोंढारकर यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या शिबिरामध्ये महसूल, ग्रामविकास, कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, सामाजिक न्याय, महावितरण, जलसंपदा, पशुसंवर्धन, सहकार, नोंदणी, भूमी अभिलेख, परिवहन तसेच इतर विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देणार असून पात्र लाभार्थ्यांना विविध सेवांचा व योजनांचा प्रत्यक्ष लाभ उपलब्ध करून देणार आहेत.

शासनाच्या सेवा नागरिकांच्या दारी पोहोचविणे, विविध प्रमाणपत्रे, दाखले, योजनांचा लाभ, तक्रारींचे त्वरित निराकरण आणि नागरिकांना एकाच ठिकाणी विविध विभागांच्या सेवा उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

नांदेड दक्षिण मतदारसंघातील सर्व नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

«
Next
Newer Post
»
Previous
Older Post

No comments:

Leave a Reply