जेष्ठ आंबेडकरी माता
मुंबई-आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ मातोश्री रिपाइं महिला जेष्ठ नेत्या समाजभूषण श्रीम सिंदूताई पगारे आईसाहेब,यांची माता रमाई आंबेडकर नगर घाटकोपर पूर्व मुंबई येथे त्यांचे चिरंजीव रिपाइं
मुंबई प्रदेश उपाध्यक्ष जेष्ठ नेते आयु.मंगेस हरिषश्चंद्र पगारे यांच्या घरी जाऊन तब्येतची विचार पुस करून सदिच्छापर ग्रेट भेट जेष्ठ पत्रकार महाराष्ट्र संध्या युट्यूब चॅनेलचे सन्माननीय संपादक आयु.तानाजी कांबळे सर, स्वताहा मी सो.ना. कांबळे आम्ही आगदी त्यांची आस्थेने विचार पुस करून सदिच्छापर भेट घेऊन चाळीस पंच्चेचाळीस वर्षांपासून रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब,राष्ट्रीय महिला नेत्या सीमाताई आठवले यांच्या नेतृत्वाखालील मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्ष चळवळीतील नामांतर,रिडलस,
खैरलांजी भोंतमांगे कुंटूबीयाचे हत्याकांड निषेधार्थ,माता रमाई आंबेडकर नगर घाटकोपर पूर्व मुंबई येथील निर्दयी हरामखोर क्रूरकर्मा एसआरपीचा फौजदार मनोहर कदम यांच्या बेछूट गोळीबारात अकरा शहिद भिमसैनिक झाले, या हत्याकांड निषेधार्थ मोर्चे इतर अनेक मोर्चे, आंदोलने,मुंबईत व दिल्लीत बैठका आदि कार्यक्रमात आदरणीय सिंदूताई पगारे यांनी सक्रिय सहभाग देऊन रिपब्लिकन पँथर चळवळीत मोठे योगदान दिले आहे,मुंबई महाराष्ट्रात आघाडीच्या धाडशी महिला जेष्ठ नेत्या म्हणून सुपरिचित आहेत.
म्हणूनच पगारे आई चळवळीतील आंबेडकरी माता आहेत! आदरणीय सिंदूताई पगारे आईच्या
मार्गदर्शनातून आम्हास चळवळीची गोडी लागुन
अन्याय अत्याचाराविरुद्ध बिनधास्त पेटून उठण्याची
लढण्याची हिमत मिळून
चळवळीत किंमत मिळाली!
त्यांच्या कणखर विचारातून उर्जा, प्रेरणा,प्रात झाल्यानेच रिपब्लिकन पक्ष चळवळीत सक्रिय आम्ही पती पत्नी सहभागी झालो! त्यात आपुलकीची माया चळवळीतील अनेक भिमसैनिका बरोबरच आम्हास खऱ्या आर्थाने मातृतुल्य प्रेम आदरणीय सिंदूताई आईने शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीत दिले त्या बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सेवानिवृत्त शिक्षका असल्यानेच रिपब्लिकन पक्ष चळवळीत ही आपली शिक्षकी पेशा जनूकाय कार्यकर्त्यांवर चालवत शिस्तबद्ध कार्यप्रणाली सामाजिक कार्यात राबविल्याने "रिपब्लिकन कार्यकर्ता" म्हणून सो.ना. कांबळे,
सौ.जयश्रीताई कांबळे आम्हा कांबळे दांपत्यास त्यांचेच आशिर्वाद मिळाल्यानेच आम्ही दोघे
सामाजिक उल्लेखनीय कार्याबद्दल समाजभूषण होवून रिपब्लिकन पक्ष
चळवळीत सक्रिय सहभाग कार्यतत्पर कार्यकर्ता म्हणून टिकून राहिलो,आज त्यांचे वयोमान जवळपास ९३ वर्षांचे असून एकदम त्या व्यवस्थित असून अतिशय छान रिपाइं आंबेडकरी चळवळीच्या चर्चा व जुन्या अनेक आठवणीतील प्रंसग व महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रत्यक्ष भेट व त्यांच्या समवेत फोटो असल्याचा भेटीअंती आम्हास सांगितल्यावर किती भाग्यवान आहेत " सिंदूताई पगारे आई"असे आम्हास अभिमानास्पद
वाटून त्यांच्या मार्गदर्शनपर भेटीचा बऱ्याच वर्षांपासून त्या नासिकालाच वास्तव्यास राहून मुंबईला कांही दिवसासाठी आपल्या मुलाकडे आल्याचे मंगेश पगारे यांनीच सांगितल्यावर आज तात्काळ पगारे आईची भेट घेतली! त्या नेहमीच बोलत की,सोना तु माझ्या
मंगेश सारखा मुलगा व सौ.जयश्रीताई कांबळे माझ्या मुलीप्रमाणेच आहोत म्हणत अनेक वर्षांपासून मुंबईत रिपब्लिकन पक्ष चळवळीत एकत्रित आपण कामे केली म्हणत, सौ.जयश्रीताई कांबळे ना फोनवरून चौकशी करत बेटा ठिक आहेसना! म्हणत चौकशी करत मला दम दिला की,जयश्रीची काळजी घेत जा, चळवळीत अतिशय छान सुंदर तुम्हा जोडीचे योगदान आहे मी त्यांची साक्षीदार,माझ्या मंग्या मुलाप्रमाणेच माझी तुम्ही कांबळे जोडीने काळजी घेवून चळवळीत वेळप्रसंगी मोठी साथ दिल्याचे सदर प्रंसगी आवर्जुन सांगितले.
अशी आमची आज आंबेडकर माता सिंदूताई पगारे यांची अचानकपणे ग्रेट भेट झाली!
माता सिंदूताईना निरोगी शत:आयुष्य लाभो हिच तथागत भगवान गौतम बुद्धांचरणी त्रिवार वंदना...करून त्याच्या प्रति सद्भावना व्यक्त करून आदरपूर्वक क्रांतिकारक जयभीम व निळा सलाम! शाॅलूट देऊन निरोप घेऊन परतल्याचे समाजभूषण सो.ना.कांबळे कळविले आहे.




No comments: