संपर्क :

📞 बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क : 9834502554 | ✉️ E-mail : janvedhnews3@gmail.com 🖇️Instagram : janvedhnews
Theme images by kelvinjay. Powered by Blogger.

मुख्य बातम्या

देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन

देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...

Breaking News

🔴 BREAKING NEWS 👉 जनवेध न्यूजमध्ये आपले स्वागत | ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या | बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8329354008 | ✉️ janvedhnews@gmail.com

Popular Posts

Lifestyle

Sports

Home » Maharashtra » Marathi News » पीक नोंदणीसाठी सहायकांना सहकार्य करा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

 

*ई-पीक पाहणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची नाळेश्वर व लिंबगाव मंडळातील शिवारात भेट*


नांदेड, दि. १२ ऑगस्ट : ई-पीक पाहणी (DCS) हा शासनाचा महत्त्वपूर्ण व प्राधान्यक्रमाचा प्रकल्प असून त्याची १०० टक्के प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा त्रास कमी करून सातबारावरील पिकांची ऑनलाइन नोंद अचूकपणे होण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक नोंदणीसाठी नियुक्त सहायकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. 


खरीप हंगाम २०२६-२७ पासून डिजिटल क्रॉप सर्व्हे मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करण्यात येत आहे. ११ ऑगस्ट ते १० नोव्हेंबर 2026 या कालावधीत ही कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. गट व सर्वे क्रमांकनिहाय प्रत्यक्ष पिकांची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित करून पीक नोंदणी अद्ययावत करण्यात येत आहे. या माहितीचा उपयोग विविध कृषी योजना, पीकविमा, आपत्ती मदत, कृषी सांख्यिकी तसेच ॲग्रीस्टॅकसाठी करण्यात येणार आहे.

ई-पीक नोंदणीचे महत्त्व व आवश्यकतेबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज नाळेश्वर मंडळातील सोमेश्वर आणि लिंबगाव मंडळातील वरखेड शिवाराला भेट दिली. यावेळी त्यांनी स्वतः मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करून शेतकऱ्यांना या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.

जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ६३९ सहायकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका, महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाचे कर्मचारी, CSC चालक तसेच ग्रामस्तरावर मानधन तत्त्वावर कार्यरत अन्य विभागांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

यावेळी तहसीलदार विपीन पाटील, मंडळ अधिकारी शिवानंद स्वामी, मधुकर फुलवळे, ग्राम महसूल अधिकारी गजानन वळगे, महेश जोशी, मारोती कदम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

*क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना*

ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी त्यांच्या लॉगिनमधून गावांचे काम वाटप अर्थात टास्क अलोकेशन तातडीने पूर्ण करावे. टास्क अलोकेशन करताना गावाच्या नकाशानुसार प्रत्यक्ष पाहणी करून सहायकास सोयीचे होईल, याची खात्री करूनच गटांचे वाटप करावे.

सहायकांनी स्थळभेटीपूर्वी मोबाईल ॲप रेंज असलेल्या ठिकाणी रिफ्रेश अथवा अपडेट करून त्यानंतरच प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.


«
Next
Newer Post
»
Previous
Older Post

No comments:

Leave a Reply