मुंबई- अंधेरी पश्चिम मुंबई येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राचे सरचिटणीस कालकथित आदरणीय चंद्रकांत बच्छाव यांचे ७९ ,वर्षी अल्पशा आजारानी दुःखद निधन दिनांक १ ऑगस्टला दुपारी झाले,असता आज दिनांक २ ऑगस्टला दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत आंबेडकरी चळवळीतील सामाजिक क्षेत्रातील विविध पक्ष संघटनात्मक नेते,शेकडो भिमसैनिकाडून तसेच मातब्बर मान्यवरांकडून
यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन अंत्ययात्रेत सहभागी होवून
मुंबई अंधेरी पश्चिम आंबोली स्मशानभूमीत बौद्ध संस्कार पद्धतीने अग्निसंस्कार करण्यात आले असता,त्यांच्या बच्छाव कुटुंबीयांसह आंबेडकरी चळवळीतील डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नात सुनष्या आयुष्यमती दर्शना भिमराव आंबेडकर,
IAS आयु. उत्तमराव खोब्रागडे,शिवसेना उबाठा उपनेते अमोल किर्तीकर,
जेष्ठ साहित्यिक पॅथर नेते अर्जून डांगळे,रिप पक्ष राज्य सरचिटणीस गौतमभाऊ सोनवणे, साहित्यिक योगिराज बागुल,दै.वृत्तरत्न सम्राटचे संपादक आयु.कुणाल बबन कांबळे,समाजभूषण सो.ना. कांबळे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष आयु.विजय जाधव,रत्नाकर रिपोटे,नितीन सोनवणे,पुष्पा धाकतोडे,संजय जाधव,सुनिल घाग,आदि केंद्राचे ट्रस्टी पदाधिकाऱ्यांसह अनेक मातब्बर दिगज मान्यवरांकडून आदरणीय दिवंगत चंद्रकांत बच्छाव साहेबांना भावपूर्ण श्रध्दाजंली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.सदर वेळेस भन्ते थेरो शांती रत्न भिखू संघाचे मुंबई अध्यक्ष बुध्द पाठ वंदना संपन्न केली.
भारतीय बौद्ध महासभा मुंबई समता सैनिक दलाच्या वतीने कंमाडिग ऑफिसर आयु प्रदिप कांबळे जयभीमच्या जयघोषात सलामी देऊन मानवंदना दिली.सदर वेळेस शेकडो भिमसैनिक कार्यकर्त्यांसह उपस्थित राहून अभिवादन केले बच्छाव साहेबांचा पुण्यानुमोदन व जाहीर अभिवादन सभा दिनांक ०९ ऑगस्ट २०२६ रविवार सकाळी ठिक १०वा. बच्छाव परिवारकडून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र अंधेरी पश्चिम मुंबई येथे आयोजित करण्यात आल्याचे शोकाकुल त्यांच्या कन्या मिनील चंद्रकांत बच्छाव आणि परिवारकडून जाहिर करण्यात आल्याचे समाजभूषण सो.ना.कांबळे यांनी कळविले आहे.
आपले विनित
वार्तांकन
समाजभूषण सो.ना.कांबळे
मुक्त पत्रकार मुंबईकर भिमसैनिक याजकडून
Mo.970299 2626 Sona24rpi@gmail.com 🙏




No comments: