संपर्क :

📞 बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क : 9834502554 | ✉️ E-mail : janvedhnews3@gmail.com 🖇️Instagram : janvedhnews
Theme images by kelvinjay. Powered by Blogger.

मुख्य बातम्या

देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन

देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...

Breaking News

🔴 BREAKING NEWS 👉 जनवेध न्यूजमध्ये आपले स्वागत | ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या | बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8329354008 | ✉️ janvedhnews@gmail.com

Popular Posts

Lifestyle

Sports

Home » Maharashtra » Marathi News » पुणे : औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत पूरग्रस्त भागांची पाहणी;*

 


दि. 03 ऑगस्ट 2026 रोजी 

 नदी सुधार प्रकल्प व तातडीच्या उपाययोजनांचे आयुक्तांचे निर्देश

औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील मुळा-मुठा नदीलगत दरवर्षी पूरस्थिती निर्माण होणाऱ्या भागांची पाहणी करण्यात आली.

*या पाहणीचे नियोजन पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर श्री.परशुराम वाडेकर* यांच्या प्रयत्नातून करण्यात आले असून

*पुणे महानगरपालिकेचे मा.आयुक्त श्री.नवलकिशोर राम*

यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली.

*हॅरिस ब्रिज परिसर,आदर्श नगर, स्मशानभूमी परिसर,बोपोडी सबवे तसेच चंद्रमणी नगर या भागांमध्ये दरवर्षी पूरस्थिती निर्माण होत असून, सुमारे ७०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे लागते.*

या पार्श्वभूमीवर पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने संबंधित ठिकाणांची सविस्तर पाहणी करण्यात आली.

*स्थळ पाहणीनंतर पुणे आयुक्त श्री.नवलकिशोर राम यांनी नदी सुधार प्रकल्पाची कामे तातडीने हाती घेण्याचे तसेच पूरनियंत्रणासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना त्वरित राबविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.* 

यासंदर्भात पुढील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी आयुक्तांच्या दालनात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.

*यावेळी...*

मा.सनीदादा निम्हण( नगरसेवक पुणे मनपा )

मा.सपनाताई छाजेड (नगरसेविका पुणे मनपा )

मा.भक्तीताई गायकवाड (नगरसेविका पुणे मनपा)

सौं.सुनिता परशुराम वाडेकर (मा.उपमहापौर पुणे मनपा)

मा.आनंद छाजेड मा.अविनाश कदम,

पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त मा.अविनाश सपकाळ, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक महापालिका आयुक्त श्री.विजय नायकल, मुख्य अभियंता श्री.राजेश बनकर (पथ विभाग), मुख्य अभियंता सौ.मनीषा शेकटकर (विद्युत विभाग) तसेच उपअभियंता सौ.स्नेहा वाघचौरे (भवन विभाग) उपस्थित होते.


*परशुराम वाडेकर* 

उपमहापौर कार्यालय पुणे महानगरपालिका

«
Next
Newer Post
»
Previous
Older Post

No comments:

Leave a Reply