*लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; स्वारगेट येथे जयंती उत्साहात साजरी*
*पुणे, दि. १ ऑगस्ट : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे*
यांच्या जयंतीनिमित्त आज स्वारगेट येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर
लोकप्रतिनिधी आणि अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अभिवादन कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मा.मुरलीधर ( मुरली अण्णा ) मोहोळ, महाराष्ट्र राज्याचे मंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील, राज्य मंत्री मा.माधुरीताई मिसाळ, पुणे महानगरपालिकेच्या महापौर मा.मंजुषाताई नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर,भाजप पुणे शहराध्यक्ष धीरजजी घाटे, स्थायी समितीचे अध्यक्ष मा.श्रीनाथ भिमाले, आमदार मा.हेमंत रासने, पीएमपीएमएलचे संचालक मा.अजय खेडेकर यांच्यासह नगरसेवक,विविध पदाधिकारी आणि अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि समतेच्या विचारांचा गौरव करत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
*मा.परशुराम वाडेकर*
(कार्यालय पुणे महानगरपालिका)





No comments: