संपर्क :

📞 बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क : 9834502554 | ✉️ E-mail : janvedhnews3@gmail.com 🖇️Instagram : janvedhnews
Theme images by kelvinjay. Powered by Blogger.

मुख्य बातम्या

देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन

देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...

Breaking News

🔴 BREAKING NEWS 👉 जनवेध न्यूजमध्ये आपले स्वागत | ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या | बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8329354008 | ✉️ janvedhnews@gmail.com

Popular Posts

Lifestyle

Sports

Home » Government सचेम्स » India News » Lifestyle » Maharashtra » महा वॉकॅथॉन २०२६ : ‘वॉक फॉर वॉटर’द्वारे जलसंवर्धनाचा जागर 21 ऑगस्ट रोजी राज्यभरात ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’चे आयोजन

नांदेड, दि. १३ ऑगस्ट २०२६ : शाश्वत विकासासाठी मृदसंवर्धन व जलसंवर्धनाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यभरात 21 ऑगस्ट २०२६ रोजी ‘महा वॉकॅथॉन–वॉक फॉर वॉटर’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी हा उपक्रम राबविण्यात येणार असून नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग अपेक्षित आहे.

‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ अर्थात ‘माती वाचवा, पाणी वाचवा, भविष्य सुरक्षित करा’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जलसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जलसंवर्धन सप्ताहातून जनजागृती राज्यात 15 ते 21 ऑगस्टदरम्यान ‘जलसंवर्धन सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मृदसंवर्धन व जलसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. जलसंवर्धनाचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी 21 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘महा वॉकॅथॉन–वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमात लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विविध संस्था तसेच नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय मुख्य व जलसंवर्धन समिती कार्यरत राहणार आहे. कार्यक्रमात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्य मंत्री, खासदार, आमदार, विधानपरिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष, महापौर, उपमहापौर, नगराध्यक्ष तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. याशिवाय प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, नामांकित व्यक्ती, कलाकार, उद्योजक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, महिला, विविध सामाजिक व क्रीडा संघटना आणि नागरिकांनीही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुशाग्र आधारित ऑनलाइन नोंदणी ‘महा वॉकॅथॉन–वॉक फॉर वॉटर’मध्ये सहभागी होण्यासाठी कुशाग्र आधारित ऑनलाइन नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्या सहभागी व्यक्तींना ई-प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या प्रचारासाठी #MahaWalkathon, #WalkForWater, #SaveSoilSaveWater या हॅशटॅगचा वापर करण्यात येणार असून सोशल मीडिया माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जाणार आहे. सोशल मीडियावर ‘रील’ स्पर्धा जलसंवर्धन सप्ताहादरम्यान Instagram च्या माध्यमातूनही जनजागृती करण्यात येणार आहे. ‘Reel for Soil and Water Conservation’ या संकल्पनेवर आधारित Instagram Reel स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून नागरिकांना जलसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या रील्स तयार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून जलसंवर्धनाचा संदेश तरुणाईपर्यंत पोहोचविण्यासह नागरिकांमध्ये पाणी बचत, मृदसंवर्धन आणि पर्यावरण संवर्धनाबाबत व्यापक जनजागृती होण्यास मदत होणार आहे. ‘माती वाचवा, पाणी वाचवा, भविष्य सुरक्षित करा’ हा संदेश घेऊन २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या महा वॉकॅथॉनमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

«
Next
Newer Post
»
Previous
Older Post

No comments:

Leave a Reply