संपर्क :

📞 बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क : 9834502554 | ✉️ E-mail : janvedhnews3@gmail.com 🖇️Instagram : janvedhnews
Theme images by kelvinjay. Powered by Blogger.

मुख्य बातम्या

देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन

देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...

Breaking News

🔴 BREAKING NEWS 👉 जनवेध न्यूजमध्ये आपले स्वागत | ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या | बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8329354008 | ✉️ janvedhnews@gmail.com

Popular Posts

Lifestyle

Sports

Home » Government सचेम्स » India News » माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाची १०० टक्के अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा; HPV लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश



नांदेड, दि. १४ ऑगस्ट : जिल्ह्यात ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व आरोग्य योजना व उपक्रमांची १०० टक्के अंमलबजावणी करावी. आरोग्य सेवा पुरविताना किंवा सोपविण्यात आलेल्या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा टास्क फोर्स (DTF), माता मृत्यू व बाल मृत्यू अन्वेषण समिती तसेच नियमित लसीकरणाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नेवले, निवासी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजाभाऊ बुटे, बालरोगतज्ज्ञ डॉ. राठोड, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत रिठे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्रीमती रेणुका दराडे आदी उपस्थित होते.

सर्व आरोग्य अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील निर्धारित उद्दिष्टे विहित मुदतीत पूर्ण करावीत. आरोग्य योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर सातत्याने देखरेख व जनजागृती करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

HPV लसीकरणाचे १०० टक्के उद्दिष्ट गाठा

१४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींसाठी राबविण्यात येणाऱ्या HPV लसीकरण मोहिमेला ८ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकही पात्र मुलगी लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. शाळा तसेच ग्रामस्तरावर व्यापक जनजागृती करून HPV लसीकरणाचे १०० टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने विशेष प्रयत्न करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

माता व बाल मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना

गरोदर मातांची वेळेवर प्रसूतीपूर्व तपासणी (ANC) करणे, हाय-रिस्क मातांचे त्वरित निदान करून त्यांना योग्य वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. माता व बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे क्षमतावर्धन व गुणात्मक प्रशिक्षण आयोजित करावे. माता व बाल मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेने कटिबद्धतेने काम करावे, असे निर्देश देण्यात आले.

डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर

लसीकरणाच्या प्रत्येक नोंदीची ‘यु-विन’ (U-WIN) डिजिटल पोर्टलवर अचूक नोंद करावी. तसेच ‘ई-विन’ (eVIN) प्रणालीद्वारे लस साठ्याचे रिअल-टाईम मॉनिटरिंग आणि तापमान नियंत्रण प्रभावीपणे करण्यात यावे, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती

नियमित लसीकरणाचे वेळापत्रक, लसीचे महत्त्व तसेच लसीकरणाच्या चार महत्त्वाच्या संदेशांबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करावी. यामध्ये लसीचे नाव, पुढील लसीकरणाची तारीख, AEFI बाबत आवश्यक खबरदारी आणि लसीकरणासाठी लसीकरण कार्ड सोबत आणण्याचे आवाहन यांचा समावेश आहे.

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या माध्यमातून गावागावात आरोग्यविषयक जनजागृती वाढवून शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

«
Next
Newer Post
»
Previous
Older Post

No comments:

Leave a Reply