*आज दि. ०७/०८/२०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागामार्फत मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.
सदर बैठकीस मा. माधुरीताई मिसाळ, राज्यमंत्री (नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व वक्फ), मा. हेमंत रासने, आमदार, मा. मंजुषा नागपुरे, महापौर, पुणे, मा. परशुराम वाडेकर, उपमहापौर, पुणे, मा. नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महानगरपालिका तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील हॅरिस ब्रिज परिसर, आदर्श नगर, हिंदू स्मशानभूमी व मुस्लीम कब्रस्तान परिसर, बोपोडी सबवे आणि चंद्रमणी नगर या पूरप्रवण भागांतील गंभीर परिस्थितीकडे उपस्थितांचे लक्ष वेधले.
या भागांमध्ये दरवर्षी पूरस्थिती निर्माण होत असून, सुमारे ७०० ते ८०० नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करावे लागते. त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच त्यांना मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागते, असे त्यांनी नमूद केले.
तसेच नदीपात्रातील गाळ, राडारोडा आणि पाण्याच्या प्रवाहातील अडथळे दूर करून नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत औंध-बाणेर परिसरातील पूरप्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी बैठकीत केली.
यावर संबंधित अधिकाऱ्यांनी सदर बाबींची दखल घेत नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजनांबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
*उपमहापौर कार्यालय पुणे*




No comments: