संपर्क :

📞 बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क : 9834502554 | ✉️ E-mail : janvedhnews3@gmail.com 🖇️Instagram : janvedhnews
Theme images by kelvinjay. Powered by Blogger.

मुख्य बातम्या

देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन

देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...

Breaking News

🔴 BREAKING NEWS 👉 जनवेध न्यूजमध्ये आपले स्वागत | ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या | बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8329354008 | ✉️ janvedhnews@gmail.com

Popular Posts

Lifestyle

Sports

Home » Maharashtra » Marathi News » नांदेड बातम्या » नशामुक्त युवा – विकसित भारत' जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

 'नशामुक्त युवा – विकसित भारत' जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद



नांदेड, दि. 3 ऑगस्ट : भारत सरकारच्या मेरा युवा भारत नांदेड यांच्या वतीने 'नशामुक्त युवा – विकसित भारत' अभियानांतर्गत जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे 1 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. या स्पर्धांसाठी यशवंत महाविद्यालय हे स्थळ भागीदार म्हणून सहभागी झाले होते. सकाळी १० वाजता उद्घाटन समारंभाने स्पर्धांची सुरुवात झाली. या स्पर्धांमध्ये १८० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

स्पर्धांचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार डी. पी. सावंत उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड तर सह-प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे उपस्थित होते.

या स्पर्धांमध्ये स्लॅम पोएट्री, वक्तृत्व/वादविवाद, घोषवाक्य लेखन, नृत्य स्पर्धा, संगीत व रॅप स्पर्धा, रिल/लघुपट निर्मिती, नुक्कड नाटक/माइम सादरीकरण तसेच चित्रकला स्पर्धा अशा एकूण आठ विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

उद्घाटन समारंभात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यसनमुक्ती हा केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचा विषय असल्याचे सांगितले. स्वतःच्या सातत्यपूर्ण आत्मविकासातूनच सक्षम युवक आणि विकसित भारताची निर्मिती होऊ शकते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती या विषयावर आधारित मौलिक चित्रकला, प्रभावी नृत्य सादरीकरणे, संगीत, रॅप तसेच नुक्कड नाटके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रत्येक स्पर्धेत सामाजिक संदेश आणि सर्जनशीलतेचा उत्कृष्ट संगम पाहायला मिळाला.

या कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक जिल्हा युवा अधिकारी अशनी अनिल कनकटे यांनी नेतृत्व केले. कार्यक्रम अधिकारी, NSS डॉ. बिंडगे, डॉ. सूर्यवंशी आणि डॉ. रत्नमाला म्हस्के यांनी सह-आयोजक म्हणून कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मोलाची भूमिका बजावली.

समारोप व पारितोषिक वितरण सोहळ्यात विविध स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. विजेत्या विद्यार्थ्यांनी आणि संघांनी आपल्या यशाचा आनंद साजरा करत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करण्याचा दृढ निर्धार व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.




«
Next
Newer Post
»
Previous
Older Post

No comments:

Leave a Reply