संपर्क :

📞 बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क : 9834502554 | ✉️ E-mail : janvedhnews3@gmail.com 🖇️Instagram : janvedhnews
Theme images by kelvinjay. Powered by Blogger.

मुख्य बातम्या

देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन

देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...

Breaking News

🔴 BREAKING NEWS 👉 जनवेध न्यूजमध्ये आपले स्वागत | ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या | बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8329354008 | ✉️ janvedhnews@gmail.com

Popular Posts

Lifestyle

Sports

Home » Maharashtra » Marathi News » महाराष्ट्रातील सातही शिक्षक आमदारांना जाहीर सवाल; शिक्षकांच्या प्रश्नांवर आवाज कुठे ?

शिक्षक आमदारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; विविध प्रलंबित मागण्यांबाबत उत्तर देण्याची मागणी महाराष्ट्र : राज्यातील शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेल्या सातही शिक्षक आमदारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणारे एक आवाहन सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. शिक्षकांच्या नावावर आमदारकी मिळाल्यानंतर खऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज कुठे आहे? असा थेट सवाल या पोस्टरच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागातील शिक्षक आमदारांचा उल्लेख करण्यात आला आहे. संबंधित आमदारांनी शिक्षकांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत किती प्रभावीपणे आवाज उठवला, याबाबत जाहीर स्पष्टीकरण देण्याची मागणी करण्यात आली आहे. शिक्षकांच्या विविध प्रश्नांचा उल्लेख पोस्टरमध्ये शिक्षक भरती, शाळार्थ आयडी, वैयक्तिक मान्यता, सेवाज्येष्ठता, पदोन्नती, वेतन व इतर प्रलंबित प्रश्नांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच शिक्षकांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत किती वेळा आवाज उठवला, किती प्रश्न उपस्थित केले, किती प्रकरणांमध्ये शासनाकडे पाठपुरावा केला आणि त्यातून प्रत्यक्षात काय निष्पन्न झाले, याचा हिशोब देण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय शिक्षकांच्या प्रश्नांवर प्रतिनिधित्व करण्यासाठी विधान परिषदेत शिक्षक आमदारांची नेमकी भूमिका काय आहे? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. जाहीर हिशोब देण्याची मागणी शिक्षक आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील शिक्षकांच्या प्रश्नांवर केलेल्या कामाचा जाहीर अहवाल द्यावा, अशी मागणी या मोहिमेत करण्यात आली आहे. विधान परिषदेत उपस्थित केलेले प्रश्न, शासनाकडे केलेला पत्रव्यवहार, पाठपुरावा केलेली प्रकरणे आणि त्यावर झालेली कार्यवाही याबाबत माहिती सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच शिक्षक संघटनांच्या बैठका, आंदोलनांमध्ये सहभाग आणि शिक्षकांच्या प्रश्नांवरील प्रत्यक्ष भूमिका याबाबतही पारदर्शकता असावी, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. “आश्वासन नाही, हिशोब हवा” पोस्टरच्या माध्यमातून शिक्षक आमदारांना उद्देशून “महाराष्ट्रातील शिक्षक आता केवळ आश्वासन नाही, हिशोब मागत आहेत” असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. शिक्षकांच्या प्रश्नांवर सातही शिक्षक आमदारांनी आपली भूमिका आणि केलेल्या कामाचा तपशील जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या पोस्टरमधील आरोप व प्रश्न हे संबंधित मोहिमेच्या आयोजकांकडून उपस्थित करण्यात आलेले आहेत. संबंधित शिक्षक आमदारांची अधिकृत भूमिका किंवा स्पष्टीकरण या पोस्टरमध्ये देण्यात आलेले नाही. त्यामुळे या प्रश्नांवर संबंधित आमदार काय उत्तर देतात, याकडे शिक्षकवर्गाचे लक्ष लागले आहे. शिक्षकांच्या प्रश्नांवर आता थेट उत्तराची अपेक्षा शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय आणि प्रभावी पाठपुरावा व्हावा, अशी अपेक्षा शिक्षकवर्गातून व्यक्त होत असताना, या मोहिमेमुळे शिक्षक आमदारांच्या कामाचा जाहीर हिशोब आणि उत्तरदायित्व हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

«
Next
Newer Post
»
Previous
Older Post

No comments:

Leave a Reply