संपर्क :

📞 बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क : 9834502554 | ✉️ E-mail : janvedhnews3@gmail.com 🖇️Instagram : janvedhnews
Theme images by kelvinjay. Powered by Blogger.

मुख्य बातम्या

देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन

देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...

Breaking News

🔴 BREAKING NEWS 👉 जनवेध न्यूजमध्ये आपले स्वागत | ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या | बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8329354008 | ✉️ janvedhnews@gmail.com

Popular Posts

Lifestyle

Sports

Home » 🏷️ SEO Keywords Nanded News » Breaking News » दिल्ली न्यूज » नांदेड » नांदेड बातम्या » महाराष्ट्र » शैक्षणिक » पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीसाठी प्रवेश अर्ज सुरू; 31 जुलैपर्यंत संधी

 



नांदेड | प्रतिनिधी : पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, शंकरनगर (ता. बिलोली) येथे शैक्षणिक वर्ष 2027-28 मधील इयत्ता सहावी प्रवेशासाठी होणाऱ्या JNVST-2027 निवड चाचणीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांना 31 जुलै 2026 पर्यंत अर्ज करता येणार असून, या प्रवेश प्रक्रियेसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

नांदेड जिल्ह्यातील मान्यताप्राप्त शाळेत शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये इयत्ता पाचवीत शिक्षण घेणारे आणि जिल्ह्याचे बोनाफाईड रहिवासी विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी इयत्ता तिसरी, चौथी आणि पाचवीचे शिक्षण सलग पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची जन्मतारीख 1 मे 2015 ते 31 जुलै 2017 या कालावधीत असावी.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शासनाच्या नियमानुसार वैध जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

JNVST-2027 ही प्रवेश परीक्षा 28 नोव्हेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांनी अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत ऑनलाइन अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य एस. जी. माण्डले यांनी केले आहे.

प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी प्रवेश अधिसूचनेतील QR Code स्कॅन करावा किंवा श्रीमती बबिता कुतुर (9130977921) अथवा विष्णू यादव (9926928732) यांच्याशी संपर्क साधावा.

«
Next
Newer Post
»
Previous
Older Post

No comments:

Leave a Reply