*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन अभिजीत दिपके ‘या मराठी पोराने’ दिल्ली हलविली - सचिन जाधव*
नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांची जाणीव मनात ठेवून महाराष्ट्रातील मराठी तरुण *अभिजीत दीपके* यांनी दिल्लीच्या राजधानीत आपल्या संघर्षाची ताकद दाखवून दिली. हातात *डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे* छायाचित्र, ओठांवर *‘जय भीम’* चा *जयघोष* आणि मनात परिवर्तनाची जिद्द घेऊन त्यांनी दिल्लीच्या रस्त्यांवर आपल्या मागण्यांसाठी आवाज बुलंद केला. *‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा* संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवत *अभिजीत दीपके* यांनी तरुणाईला संघटित करण्याचे काम केले. त्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात संविधान, सामाजिक न्याय आणि वंचितांच्या हक्कांसाठीचा निर्धार स्पष्टपणे दिसून आला. *हातात तिरंगा, डोक्यात बाबासाहेबांचे विचार आणि छातीत परिवर्तनाची आग* घेऊन सहभागी झालेल्या आंदोलकांच्या घोषणांनी दिल्लीचा परिसर दुमदुमून गेला. *‘जय भीम’* च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले, तर आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेच्या भावना देशाच्या राजधानीपर्यंत पोहोचविण्यात आल्या. *संघर्षाची भूमी कोणतीही असो, त्या संघर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारांची आग पेटलेली नसेल, तर संघर्षाला धार येत नाही आणि आवाज बुलंद होत नाही. बाबासाहेबांच्या विचारांशिवाय सामाजिक न्यायाच्या लढ्याला पर्याय नाही.* *डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ प्रेरणास्थान नाहीत, तर संघर्षाची ऊर्जा, संघटनेची दिशा आणि परिवर्तनाचा मार्ग आहेत.* त्यांच्या विचारांची मशाल हातात घेऊन *अभिजीत दीपके* यांनी दिल्लीच्या सत्ताकेंद्रापर्यंत आपल्या संघर्षाचा आवाज पोहोचविला. *“शिका… संघटित व्हा… संघर्ष करा!” या बाबासाहेबांच्या विचारांचा नारा देत ‘या मराठी पोराने दिल्ली हलविली’ अशी भावना आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि सबंध महाराष्ट्रातून व्यक्त होत आहे. बाबासाहेबांच्या विचारांची आग असेल, तर संघर्ष पेटतो;* संघटन उभे राहते आणि आवाज दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचतो. *जय 🇪🇺 भीम !* *इनक्लाब 🔥 जिंदाबाद !!* *--सचिन जाधव* *सचिव आरपीआय (आ) सांगली जिल्हा*संपर्क :
मुख्य बातम्या
देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन
देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...
Breaking News
🔴 BREAKING NEWS
Home Link: Nanded महाराष्ट्र Link: /search/label/महाराष्ट्र देश Link: /search/la
Popular Posts
-
खानदेशात केळीची आवक वाढली; निर्यातक्षम केळीला २२०० रुपयांपर्यंत दर खानदेश : मागील पाच ते सात दिवसांपासून खानदेशात केळीच्या आवकेत वाढ झाली ...
-
नांदेड जिल्ह्यातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा; पात्र रुग्णांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन नांदेड : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्ग...
-
तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष हरदीप सिंग गिल यांनी घेतले दर्शन नांदेड (जिमाका), दि. ...
Menu Footer Widget
Lifestyle
Sports
Home
»
Maharashtra
»
Medanta Hospitle
»
जंतर मंतर
»
दिल्ली न्यूज
»
नांदेड
»
महसूल
»
महाराष्ट्र
»
विद्यार्थी आंदोलन
»
*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन अभिजीत दिपके ‘या मराठी पोराने’ दिल्ली हलविली - सचिन जाधव*
जनवेध न्यूज 's Admin
We are.., This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
Subscribe to:
Post Comments (Atom)




No comments: