नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणूक; 95.54 टक्के मतदानाची नोंद
नांदेड | जनवेध न्यूज
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एनडीसीसी) संचालक मंडळ 2026–2031 निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 16 मतदान केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत झालेल्या मतदानात मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
उपलब्ध आकडेवारीनुसार, एकूण 1,344 मतदारांपैकी 1,284 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, एकूण मतदानाची टक्केवारी 95.54 टक्के इतकी नोंदविण्यात आली.
काही मतदान केंद्रांवर 100 टक्के मतदान झाल्याची नोंद असून, देगलूर (99.04%), किनवट (99.10%) आणि बिलोली (98.61%) येथेही मोठ्या प्रमाणात मतदान झाले. तर लोहा (89.19%), मुदखेड (88.46%), नायगाव (92.00%), नांदेड (92.93%) आणि कंधार (93.65%) येथेही समाधानकारक मतदानाची नोंद झाली.
निवडणूक प्रक्रिया प्रशासनाने शांततेत व सुरळीत पार पाडली असून, आता सर्वांचे लक्ष मतमोजणी आणि निकालाकडे लागले आहे.




No comments: