संपर्क :

📞 बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क : 9834502554 | ✉️ E-mail : janvedhnews3@gmail.com 🖇️Instagram : janvedhnews
Theme images by kelvinjay. Powered by Blogger.

मुख्य बातम्या

देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन

देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...

Breaking News

🔴 BREAKING NEWS 👉 जनवेध न्यूजमध्ये आपले स्वागत | ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या | बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8329354008 | ✉️ janvedhnews@gmail.com

Popular Posts

Lifestyle

Sports

Home » 🏷️ SEO Keywords Nanded News » Maharashtra » Marathi News » नांदेड » नांदेड बातम्या » राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाला यश; १७ बालकांना मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी ठाण्याला रवाना




 राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाला यश; १७ बालकांना मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी ठाण्याला रवाना


नांदेड | प्रतिनिधी


राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील जन्मजात हृदयविकाराने ग्रस्त १७ बालकांना मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी रविवारी तपोवन एक्सप्रेसने ठाणे येथील कीम्स हॉस्पिटलकडे रवाना करण्यात आले. या सर्व बालकांवर शासनाच्या वतीने पूर्णपणे मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

जिल्हा रुग्णालय, नांदेड येथे नुकत्याच आयोजित विशेष हृदयरोग तपासणी शिबिरात १०९ बालकांची 2D इकोद्वारे तपासणी करण्यात आली होती. तपासणीनंतर जन्मजात हृदयविकार असलेल्या १७ बालकांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.

बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, जन्मजात व्यंग, कुपोषण, विकासातील अडथळे आणि विविध आजारांचे लवकर निदान करून योग्य उपचार उपलब्ध करून देणे हा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. नांदेड जिल्ह्यात ४५ आरोग्य पथकांमार्फत अंगणवाडी व शाळांमधील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते.

या कार्यक्रमाअंतर्गत हृदयरोग, नेत्रविकार, आकडीसह विविध आजारांसाठी विशेष तपासणी शिबिरे घेण्यात येतात. गरजेनुसार औषधोपचार, शस्त्रक्रिया, पोषण पुनर्वसन केंद्रातील उपचार तसेच जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रामार्फत (DEIC) विशेष वैद्यकीय सेवा मोफत दिल्या जातात.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील आणि उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. रेखा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनुपमा शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे आणि डॉ. अविनाश दहिफळे यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर यशस्वीपणे पार पडले.

या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील बालकांना अत्याधुनिक हृदय शस्त्रक्रियेची संधी मोफत उपलब्ध झाली असून, पालकांनी शासनाच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आरबीएसके समन्वयक अनिल कांबळे, डीईआयसी व्यवस्थापक विठ्ठल तावडे, अनिता चव्हाण तसेच आरबीएसकेच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष योगदान दिले.

«
Next
Newer Post
»
Previous
Older Post

No comments:

Leave a Reply