संपर्क :

📞 बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क : 9834502554 | ✉️ E-mail : janvedhnews3@gmail.com 🖇️Instagram : janvedhnews
Theme images by kelvinjay. Powered by Blogger.

मुख्य बातम्या

देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन

देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...

Breaking News

🔴 BREAKING NEWS 👉 जनवेध न्यूजमध्ये आपले स्वागत | ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या | बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8329354008 | ✉️ janvedhnews@gmail.com

Popular Posts

Lifestyle

Sports

Home » 🏷️ SEO Keywords Nanded News » Maharashtra » विशेष सखोल पुनर्निरक्षण’ (SIR) कार्यक्रमाच्‍या अनूषंगाने राजकीय पक्षाचे प्रतिनिधि यांना Enumeration Form Uncollectable असलेले मतदारांची यादी सुपूर्द

 


नांदेड दि. २७ जुलै:- 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ अंतर्गत एकूण 312 मतदार यादी भागाच्‍या अनूषंगाने ‘विशेष सखोल पुनर्निरक्षण’ (SIR) अनूषंगीक कामे चालू असून त्‍याअनूषंगाने आज दिनांक 27 जूलै 2026 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय नांदेड येथे राजकीय पक्षाचे प्रतिनिधि यांची बैठक आयोजित करण्‍यात आली होती. 


सदर बैठकीत विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधि उपस्थित होते. सदर बैठकीत आज रोजीपर्यंत वाटप झालेले गणना पत्र, मतदारांकडून परत बि.एल.ओ. यांचेकडे प्राप्‍त झालेले गणना पत्र तसेच Digitization झालेले गणना पत्र ( Enumeration Form ) ची माहिती सर्व उपस्थित प्रतिनिधि यांना देण्‍यात आली. 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ अंतर्गत आजरोजी पर्यंत Enumeration Form चे वाटप 95%, व Digitization चे 74 टक्के याप्रमाणे एकंदरीत 85 टक्के इतके काम पूर्ण झालेले आहे. यापूर्वी दिनांक 22 जूलै रोजी झालेल्‍या बैठकीत राजकीय पक्षाचे बि.एल.ऐ. यांनी सदर कामात सहकार्य करणे बाबत या कार्यालयाकडून आवाहन करण्‍यात आल्‍यानंतर अवघ्‍या 5 दिवसात कामाची एकंदरीत 13 टक्के एवढी प्रगती झाली आहे. 

तसेच मतदार यादीत नांव समाविष्‍ठ आहे परंतू आजरोजी पर्यंत ज्‍या मतदारांचे Enumeration Form अद्याप सबंधित बि.एल.ओ. यांचेकडे प्राप्‍त झालेले नाही असे मतदारांची यादी व सबंधित मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांनी Enumeration Form Uncollectable ( मयत, गैरहजर, स्‍थलांतरित, दुबार व इतर कारणांमूळे ) असे मार्क केलेले मतदान केंद्रनिहाय मतदारांची यादी उपस्थित राजकीय पक्षाचे प्रतिनिधि यांना PDF स्‍वरूपात देण्‍यात आली. 

बि.एल.ओ. यांचेकडून Enumeration Form वाटप करण्‍यात आले परंतू बरेच मतदारांनी अद्याप सबंधित बि.एल.ओ. यांचेकडे सदर फॉर्म भरून स्‍वाक्षरीसह जमा केलेला नाही तसेच विशेषतः सिडको, हडको, ईतवारा, चौफाळा व किला रोड या भागातील मतदारांचे Enumeration Form सबंधित बि.एल.ओ. यांचेकडे जमा झालेले नाहीत त्‍यामूळे उक्‍त भागातील कामाची टक्‍केवारी कमी आहे. 

करिता Uncollectable असलेले सर्व Enumeration Form सबंधित बि.एल.ओ. यांचेकडे जमा करावेत. तसेच आपण स्‍वतः देखिल प्रयत्‍न करावेत व वर नमूद केल्‍याप्रमाणे ज्‍या मतदारांनी सदर फॉर्म विहित मूदतीत बि.एल.ओ. यांचेकडे जमा केले नाही अथवा बि.एल.ओ. यांनी Enumeration Form Uncollectable असे मार्क केलेले आहेत अश्‍या मतदारांचे नांव प्रारुप मतदार यादीत समाविष्‍ठ होणार नाही तसेच ज्‍या मतदारांचे फॉर्म बि.एल.ओ. यांचेकडे जमा होतील केवळ त्‍याच मतदारांचे नांव प्रारुप मतदार यादीत समाविष्‍ठ होतील तसेच ज्‍या मतदारांचे नांव प्रारूप मतदार यादीत येणार नाहीत अश्‍या मतदारांनी आवश्‍यक पूरावे सादर केल्‍याशिवाय अंतिम मतदार यादीत देखिल नांवे समाविष्‍ठ होणार नाही असे डॉ.सचिन खल्‍लाळ, मतदार नोंदणी अधिकारी 87 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी नांदेड यांनी उपस्थित प्रतिनिधि यांना सांगीतले.   

यावेळी संजय वारकड सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार नांदेड, श्री नितेशकुमार बोलोलु, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा नायब तहसिलदार निवडणुक, उपविभागीय कार्यालयातील नायब तहसिलदार संजय नागमवाड, 87 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ अंतर्गत नियुक्‍त सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी व विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधि उपस्थित होते.

«
Next
Newer Post
»
Previous
Older Post

No comments:

Leave a Reply