संपर्क :

📞 बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क : 9834502554 | ✉️ E-mail : janvedhnews3@gmail.com 🖇️Instagram : janvedhnews
Theme images by kelvinjay. Powered by Blogger.

मुख्य बातम्या

देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन

देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...

Breaking News

🔴 BREAKING NEWS 👉 जनवेध न्यूजमध्ये आपले स्वागत | ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या | बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8329354008 | ✉️ janvedhnews@gmail.com

Popular Posts

Lifestyle

Sports

Home » Maharashtra » Marathi News » नांदेड » मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेडमध्ये विविध आरोग्य उपक्रम; 387 रक्तपिशव्यांचे संकलन



नांदेड | प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी (नांदेड) येथे 22 ते 28 जुलै 2026 या कालावधीत विविध आरोग्यविषयक शिबिरे, तपासणी मोहिमा, रक्तदान शिबिर तसेच जनकल्याणकारी आरोग्य उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व आयुष, मुंबई तसेच जिल्हाधिकारी नांदेड यांच्या निर्देशानुसार आयोजित या उपक्रमांत 387 रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. तसेच स्तन कर्करोग तपासणी शिबिरात 330 महिलांची, बोन मिनरल डेन्सिटी व हाड तपासणी शिबिरात 332 नागरिकांची, नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात 888 रुग्णांची, तर गर्भाशय मुख कर्करोग तपासणी शिबिरात 224 महिलांची तपासणी करून आवश्यक उपचार व मार्गदर्शन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियानांतर्गत नागरिकांना त्यांच्या परिसरातच तज्ज्ञ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आली. 22 जुलै रोजी ओम गार्डन, कौठा (नांदेड) येथे झालेल्या शिबिरात 516 रुग्णांची, तर 26 जुलै रोजी ए. के. संभाजी मंगल कार्यालय, वाडी (बु.), नांदेड येथे आयोजित शिबिरात 546 रुग्णांची तपासणी करून विविध तज्ज्ञ वैद्यकीय सेवा देण्यात आल्या.

या उपक्रमांमुळे कर्करोगासह विविध आजारांचे लवकर निदान, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, रक्तदानाबाबत जनजागृती तसेच सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण, सुलभ आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देश प्रभावीपणे साध्य झाला.

या सर्व उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विजयकुमार कापसे (वैद्यकीय अधीक्षक), डॉ. अजय वराडे (उपवैद्यकीय अधीक्षक), डॉ. शिवानंद देवसरकर (उपवैद्यकीय अधीक्षक), डॉ. अक्षय गव्हाणे (वैद्यकीय अधिकारी) तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख, वैद्यकीय अधिकारी, निवासी डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, कर्मचारी आणि स्वयंसेवक यांनी मोलाचे योगदान दिले.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी हे शासनाच्या जनकल्याणकारी आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने कार्यरत असून भविष्यातही अशाच लोकाभिमुख आरोग्य उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 

«
Next
Newer Post
»
Previous
Older Post

No comments:

Leave a Reply