संपर्क :

📞 बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क : 9834502554 | ✉️ E-mail : janvedhnews3@gmail.com 🖇️Instagram : janvedhnews
Theme images by kelvinjay. Powered by Blogger.

मुख्य बातम्या

देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन

देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...

Breaking News

🔴 BREAKING NEWS 👉 जनवेध न्यूजमध्ये आपले स्वागत | ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या | बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8329354008 | ✉️ janvedhnews@gmail.com

Popular Posts

Lifestyle

Sports

Home » »Unlabelled » तुकाराम मुंढे यांचा इशारा; शाळांची वर्षातून दोनदा तपासणी, व्यवस्थापनासह पालकांचीही जबाबदारी निश्चित.शाळांमध्ये चॉकलेट, वडापाव, समोशांवर बंदी? नियम मोडणाऱ्यांवर FDA ची कारवाई..

शाळांमध्ये चॉकलेट, वडापाव, समोशांवर FDA ची कडक भूमिका; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा मुंबई, दि. 30 जुलै : महाराष्ट्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. शाळांमध्ये वाढदिवस, स्वातंत्र्य दिन, दिवाळी किंवा इतर कार्यक्रमांमध्ये चॉकलेट, समोसे, वडापाव, लाडू यांसारखे तेलकट व साखरयुक्त पदार्थ वाटप केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. FDA कडून येत्या काही दिवसांत राज्यभरातील शाळांची तपासणी सुरू होणार असून, प्रत्येक शाळेची वर्षातून किमान दोन वेळा पाहणी केली जाणार आहे. या तपासणीत केवळ शाळेतील कॅन्टीनच नव्हे, तर शाळेत होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचीही तपासणी केली जाईल. तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, लहानपणापासून मुलांना सकस व पौष्टिक आहाराची सवय लागणे आवश्यक आहे. त्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांपासून बचाव होण्यास मदत होते. या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच पालकांचीही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित शाळा व्यवस्थापनावर कारवाई केली जाईल. वारंवार नियम मोडणाऱ्या संस्थांच्या संलग्नतेबाबतही आवश्यक ती कार्यवाही केली जाऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला. FDA ने शाळांना कॅफिनयुक्त, ट्रान्स फॅट, संतृप्त चरबी आणि जास्त साखर असलेले पदार्थ शाळेच्या परिसरात तसेच शाळेपासून ५० मीटरच्या परिसरात विक्रीस किंवा वाटपासाठी उपलब्ध करून न देण्याचे निर्देश दिले आहेत. पालकांनीही मुलांना जंक फूडपासून दूर ठेवून फळे, सुका मेवा, पौष्टिक घरगुती पदार्थ यांसारख्या आरोग्यदायी पर्यायांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही तुकाराम मुंढे यांनी केले आहे. शाळांमध्ये आरोग्यदायी आहाराची संस्कृती रुजविण्यासाठी सर्व शिक्षण मंडळांना संबंधित मार्गदर्शक सूचना संलग्न शाळांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश देण्यात आले असून, नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर दिला जाणार आहे.

«
Next
Newer Post
»
Previous
Older Post

No comments:

Leave a Reply