रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशची येत्या 25 जुलै रोजी महत्वपूर्ण बैठक केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले मार्गदर्शन करणार
*रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशची येत्या 25 जुलै रोजी महत्वपूर्ण बैठक*
*केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले मार्गदर्शन करणार*
मुंबई दि. 23 - रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशची महत्वपूर्ण बैठक येत्या शनिवार दिनांक 25 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता सांताव्रुझ पूर्व, कालिना येथील भिमछाया, सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीस मुंबईतील रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय आणि राज्यकार्यकारणीचे पदाधिकारी, मुंबई प्रदेशचे पदाधिकारी सर्व जिल्हा आणि तालुका प्रमुख, युवक आणि महिला आघाडीसह सर्व आघाडींचे पदाधिका-यांनी या महत्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे यांनी केले आहे.
रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, मुंबई सरचिटणीस विवेक पवार, कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड, कार्याध्यक्ष प्रकाश खंडागळे, खजिनदार सुनिल मोरे, यांनी रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशच्या बैठकीचे आयोजन येत्या 25 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता सांताव्रुझ पूर्व, कालिना येथील भिमछाया, सांस्कृतिक केंद्र येथे केले आहे.
हेमंत रणपिसे
प्रसिध्दीप्रमुख
Tag: Breaking News Maharashtra




No comments: