संपर्क :

📞 बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क : 9834502554 | ✉️ E-mail : janvedhnews3@gmail.com 🖇️Instagram : janvedhnews
Theme images by kelvinjay. Powered by Blogger.

मुख्य बातम्या

देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन

देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...

Breaking News

🔴 BREAKING NEWS 👉 जनवेध न्यूजमध्ये आपले स्वागत | ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या | बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8329354008 | ✉️ janvedhnews@gmail.com

Popular Posts

Lifestyle

Sports

Home » »Unlabelled » आपले सरकार सेवा केंद्रांना स्मार्ट लुक देण्यासाठी जिल्हा प्रशासन सरसावले


नांदेड, दि. 23 ऑगस्ट 2026 : जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रांनी शासन निर्णयानुसार निर्धारित गुणवत्ता, मानांकन आणि कार्यपद्धतीचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी 22 ऑगस्ट रोजी नांदेड शहरातील दोन आपले सरकार सेवा केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन केंद्रांची सखोल पाहणी केली.

पाहणीदरम्यान शासनाच्या निर्धारित निकषांचे पालन न करणाऱ्या केंद्रावर नियमानुसार कारवाई करण्यात आली. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रचालकांना प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करताना केंद्र शासन निर्णयानुसार निर्धारित जागेत सुरू आहे का, केंद्राच्या आतील व बाहेरील बॅनर, उपलब्ध सेवा व दरसूची, स्वच्छता, विद्युत व्यवस्था, संगणक संच, प्रिंटर, UPS, वेब कॅमेरा आदी सुविधांची तपासणी केली. तसेच केंद्राच्या खोलीचे आवश्यक आकारमान, नागरिकांसाठी पिण्याचे पाणी व बसण्याची व्यवस्था आणि अर्जदारांची कागदपत्रे व छायाचित्रांची माहिती संगणक प्रणालीमध्ये सुरक्षित पद्धतीने जतन केली जाते का, याचीही पडताळणी करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केंद्रावर उपस्थित अर्जदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून सेवांबाबत माहिती घेतली. शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कापेक्षा अतिरिक्त रक्कम आकारली जाते का, पावती दिली जाते का आणि ऑनलाइन पावतीमध्ये नमूद असलेल्या शुल्कानुसारच रक्कम स्वीकारली जाते का, याचीही प्रत्यक्ष चौकशी करण्यात आली.

अर्जदारांनी आपले सरकार सेवा केंद्रातून कोणतीही सेवा घेताना केंद्रचालकाकडून रीतसर पावती घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या विविध सेवा पारदर्शक, सुलभ आणि नियमानुसार उपलब्ध करून देणे हा शासनाचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे सर्व केंद्रचालकांनी शासन निर्णयातील सर्व निकषांची काटेकोरपणे पूर्तता करून केंद्रे नियमितपणे सुरू ठेवावीत.

नियमांचे उल्लंघन, अनधिकृत शुल्क आकारणी, अपुऱ्या सुविधा किंवा केंद्र बंद ठेवणे आढळल्यास संबंधित केंद्रावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट संदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पाहणीदरम्यान दिला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांनीही सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी नियमानुसार काम करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला.

या पाहणीवेळी उपविभागीय अधिकारी नांदेड डॉ. सचिन खल्लाळ, नायब तहसीलदार सुनील माचेवाड, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक नीरज धामणगावे आदी उपस्थित होते.

«
Next
Newer Post
»
Previous
Older Post

No comments:

Leave a Reply