संपर्क :

📞 बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क : 9834502554 | ✉️ E-mail : janvedhnews3@gmail.com 🖇️Instagram : janvedhnews
Theme images by kelvinjay. Powered by Blogger.

मुख्य बातम्या

देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन

देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...

Breaking News

🔴 BREAKING NEWS 👉 जनवेध न्यूजमध्ये आपले स्वागत | ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या | बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8329354008 | ✉️ janvedhnews@gmail.com

Popular Posts

Lifestyle

Sports

Home » 🏷️ SEO Keywords Nanded News » Maharashtra » कोल्हापूर : अनुसूचित जातीतील आरक्षण उपवर्गीकरण रद्द करा-रिपाई

अनुसूचित जातीतील आरक्षण उपवर्गीकरण रद्द करा-रिपाई

*दि.२८|जूलै|२०२६ -कोल्हापूर-प्रतिनीधी-* *१|ऑगस्ट|२०२४ रोजी मान. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात अनुसूचित जाती(SC) अनुसूचित जमाती(ST) या सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय जातीच्या ५९ जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकार भारतातील राज्याने स्वतःच्या अधिकारात घ्यावा असा निर्णय दिल्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी माजी न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून अनुसूचित जातीच्या ५९ जातीमध्ये उपवर्गीकरण अ, ब, क,ड.करण्याचे जाहीर केले आहे.* *यामुळे अनुसूचित जातीच्या ५९जाती भारतीय संविधानाने एकत्र ठेवल्या आहेत त्याला तडा देण्याचे आणि जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचे काम महाराष्ट्र सरकारकडून होत आहे त्याला विरोध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्यावतीने रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदासजी (आठवले) साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आंदोलने करण्यासंदर्भात ३ जुलै रोजी जाहीर केले होते त्याचाच एक भाग म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने राज्य सरकारचा जाहीर निषेध करत तावडे हॉटेल चौक येथे "रस्ता रोको"करण्यात आला.* *यावेळी भारतीय संविधानाने दिलेल्या अनुसूचित जातीच्या ५९ जातीमध्ये सलोखा राखण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय तात्काळ रद्द करावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व कोल्हापूर जिल्ह्याचे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष आयु.दत्ता मिसाळ (अण्णा) तसेच रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव आयु. सतीश माळगे (दादा)यांनी केले.* *या आंदोलनात सरदार आमशीकर,अमोल गवळी, अविनाश कांबळे, हंबीरराव तरटे, सर्जेराव कांबळे,बाळासो कांबळे, सुरेश पाटील,राहुल गलगलेकर, दिनेश पवार,सुभाष धनवडे, जॉन्सन सहेरीया,अजयकुमार सनदे,अलंकार माने,सागर कांबळे, मनोज कांबळे,अभिजीत वसगडे,गणेश भोसले,सुरज रोकडे,रफिक बडागर,बाबासो कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.*

«
Next
Newer Post
»
Previous
Older Post

No comments:

Leave a Reply