संपर्क :

📞 बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क : 9834502554 | ✉️ E-mail : janvedhnews3@gmail.com 🖇️Instagram : janvedhnews
Theme images by kelvinjay. Powered by Blogger.

मुख्य बातम्या

देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन

देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...

Breaking News

🔴 BREAKING NEWS 👉 जनवेध न्यूजमध्ये आपले स्वागत | ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या | बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8329354008 | ✉️ janvedhnews@gmail.com

Popular Posts

Lifestyle

Sports

Home » Breaking News » BUSINESS » India News » Maharashtra » Marathi News » नांदेड » नांदेड बातम्या » केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विविध विभागांच्या योजनांचा घेतला आढावा

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विविध विभागांच्या योजनांचा घेतला आढावा

नांदेड , दि. 19 : केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विविध शासकीय विभागांच्या योजनांचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत योजनांची सद्यस्थिती, अंमलबजावणीतील प्रगती तसेच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणाऱ्या सुविधांचा सखोल आढावा घेण्यात आला. शासकीय विश्रामगृहात आयोजित या बैठकीत महानगरपालिकेच्या घरकुल योजनेचा, समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांचा, जाती पडताळणी समितीच्या कामकाजाचा, ॲट्रॉसिटी प्रकरणांच्या नोंदी व त्यावरील कार्यवाहीचा तसेच दिव्यांग कल्याण विभागाच्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचतो आहे का, तसेच अंमलबजावणीत काही अडचणी आहेत का, याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेण्यात आली. बैठकीस उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुरज गुरव, मनपा अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या सदस्य डॉ. छाया कुलाल, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी राजेश एडके, जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक तेलंग, लीड बँकेचे व्यवस्थापक सोनकांबळे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

«
Next
Newer Post
»
Previous
Older Post

No comments:

Leave a Reply