संपर्क :

📞 बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क : 9834502554 | ✉️ E-mail : janvedhnews3@gmail.com 🖇️Instagram : janvedhnews
Theme images by kelvinjay. Powered by Blogger.

मुख्य बातम्या

देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन

देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...

Breaking News

🔴 BREAKING NEWS 👉 जनवेध न्यूजमध्ये आपले स्वागत | ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या | बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8329354008 | ✉️ janvedhnews@gmail.com

Popular Posts

Lifestyle

Sports

Home » India News » Lifestyle » LPG सिलिंडरच्या झंझटीपासून लवकरच सुटका

घराघरात पाइपद्वारे PNG गॅस पोहोचवण्याचा केंद्राचा प्रयत्न

नवी दिल्ली : दर महिन्याला एलपीजी सिलिंडर बुक करणे, सिलिंडर संपल्यानंतर त्याची व्यवस्था करणे आणि डिलिव्हरीची प्रतीक्षा करणे या दैनंदिन त्रासातून नागरिकांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने पाइपद्वारे घरगुती गॅसपुरवठा वाढवण्यावर भर दिला आहे. घरगुती एलपीजीऐवजी पाइप्ड नॅचरल गॅस अर्थात PNGचा वापर वाढवण्यासाठी सरकारकडून नवीन प्रोत्साहन योजना राबविण्यात येणार आहे. १ सप्टेंबरपासून नवीन प्रोत्साहन योजना सरकारने १ सप्टेंबर २०२६ पासून ‘APM/NAPM प्रोत्साहन योजना’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. देशातील घरगुती PNG कनेक्शन्सची संख्या वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सध्या देशभरात सुमारे १.७४ कोटी घरगुती PNG कनेक्शन्स असल्याचे सांगण्यात आले आहे. ही संख्या आणखी वाढवण्यासाठी सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (CGD) कंपन्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. नवीन कनेक्शन वाढवणाऱ्या कंपन्यांना फायदा या योजनेअंतर्गत निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक नवीन PNG कनेक्शन्स देणाऱ्या CGD कंपन्यांना प्रति अतिरिक्त कनेक्शन २०० मानक घनमीटरपर्यंत स्वस्त APM गॅस उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. सरकारच्या अंदाजानुसार, या सवलतीमुळे कंपन्यांचा गुंतवणुकीवरील परताव्याचा कालावधी सुमारे १० वर्षांवरून ३ वर्षांपर्यंत कमी होऊ शकतो. त्यामुळे नवीन भागांमध्ये PNG पाइपलाइनचे जाळे विस्तारण्यास कंपन्यांना प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. PNG कनेक्शनसाठी एकच ऑनलाइन पोर्टल सामान्य नागरिकांना PNG कनेक्शन घेणे अधिक सोपे व्हावे यासाठी सरकार ‘एकीकृत PNG नोंदणी पोर्टल’ सुरू करण्याच्या तयारीत आहे. हे पोर्टल सिंगल-विंडो प्रणालीप्रमाणे काम करणार आहे. या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन PNG कनेक्शनसाठी अर्ज करता येणार असून, अर्ज आणि कनेक्शनची स्थिती ऑनलाइन पाहण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे. LPG पूर्णपणे बंद होणार का? या निर्णयाचा अर्थ असा नाही की देशभरातील LPG सिलिंडर तातडीने बंद केले जाणार आहेत. सरकारचा मुख्य भर PNG कनेक्शन्स आणि पाइपलाइन नेटवर्कचा विस्तार करण्यावर आहे. ज्या भागात PNGची सुविधा उपलब्ध होईल, तेथे नागरिकांना घरगुती गॅसचा पर्यायी आणि पाइपद्वारे मिळणारा स्रोत उपलब्ध होऊ शकतो.

«
Next
Newer Post
»
Previous
Older Post

No comments:

Leave a Reply