संपर्क :

📞 बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क : 9834502554 | ✉️ E-mail : janvedhnews3@gmail.com 🖇️Instagram : janvedhnews
Theme images by kelvinjay. Powered by Blogger.

मुख्य बातम्या

देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन

देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...

Breaking News

🔴 BREAKING NEWS 👉 जनवेध न्यूजमध्ये आपले स्वागत | ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या | बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8329354008 | ✉️ janvedhnews@gmail.com

Popular Posts

Lifestyle

Sports

Home » नांदेड बातम्या » महसूल » किनवट पंचायत समिती सभागृहात विशेष बैठक ; जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

 *सामूहिक वनहक्कांच्या संवर्धनासाठी आराखडा तयार करा*

• *किनवट पंचायत समिती सभागृहात विशेष बैठक ;* 

• *जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे अधिकाऱ्यांना निर्देश*

नांदेड दि. 17 ऑगस्ट :- सामूहिक वनहक्क प्राप्त गावांमध्ये वनहक्कांचे संवर्धन व प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी ‘सामूहिक वनहक्क संवर्धन व व्यवस्थापन आराखडा’ तयार करण्याबाबत आज किनवट येथील पंचायत समिती सभागृहात विशेष बैठक घेण्यात आली. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी बी. सरवनन यांच्या नियोजनातून या बैठकीचे आयोजन करण्यात आले. 

बैठकीत जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी सामूहिक वनहक्कांचे संवर्धन, व्यवस्थापन तसेच त्याचा गावांच्या विकासासाठी प्रभावी वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले. सामूहिक वनहक्कांचा आराखडा लवकरात लवकर तयार करून त्यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून वनसंपत्तीचे संवर्धन, उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन आणि ग्रामस्थांच्या सहभागातून विविध विकासकामांचे नियोजन करण्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी बी. सरवनन, तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर, गट विकास अधिकारी जयश्री वाघमारे, वनपरिक्षेत्र अधिकारी धीरज मदने, जिल्हा वनहक्क समितीचे सदस्य तसेच देवगिरी कल्याण आश्रमचे प्रांत उपाध्यक्ष उत्तमराव सुपाते, डॉ. उत्तम धुमाळे, किनवटचे तुकाराम पेंदोर, नमिता गेडाम, गजानन डवरे, जिल्हा सचिव विश्वनाथ पधाने आदी उपस्थित होते.

*आराखड्याला प्राधान्य* 

सामूहिक वनहक्क प्राप्त गावांचा आराखडा तयार करताना ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग घेऊन वनसंपत्तीचे संवर्धन आणि उपजीविकेच्या साधनांचा विकास करण्यावर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी बैठकीत दिली.


«
Next
Newer Post
»
Previous
Older Post

No comments:

Leave a Reply