संपर्क :

📞 बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क : 9834502554 | ✉️ E-mail : janvedhnews3@gmail.com 🖇️Instagram : janvedhnews
Theme images by kelvinjay. Powered by Blogger.

मुख्य बातम्या

देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन

देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...

Breaking News

🔴 BREAKING NEWS 👉 जनवेध न्यूजमध्ये आपले स्वागत | ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या | बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8329354008 | ✉️ janvedhnews@gmail.com

Popular Posts

Lifestyle

Sports

Home » Government सचेम्स » India News » Lifestyle » Maharashtra » महा-डीबीटीवर आता १०५ योजना; २९ नवीन योजनांचा शुभारंभ

 

महा-डीबीटीवर आता १०५ योजना; २९ नवीन योजनांचा शुभारंभ



मुंबई : राज्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावीपणे मिळावा, यासाठी महा-डीबीटी 2.0 अंतर्गत २९ नवीन योजनांचा आज शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे या योजनांचे ऑनबोर्डिंग करण्यात आले. त्यामुळे महा-डीबीटी पोर्टलवरील उपलब्ध योजनांची संख्या आता १०५ झाली आहे.

महा-डीबीटीच्या माध्यमातून विविध विभागांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. सध्या आणखी २३१ योजनांचे काम प्रक्रियेत असून, भविष्यात शासनाच्या उर्वरित प्रमुख योजनाही टप्प्याटप्प्याने या पोर्टलवर आणण्याचे उद्दिष्ट आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ थेट आणि योग्य पद्धतीने पोहोचविण्यासाठी डिजिटल प्रणाली अधिक सक्षम करण्यावर शासनाचा भर आहे. ‘सेकंड जनरेशन रिफॉर्म्स’ अंतर्गत महा-डीबीटी व्यवस्था अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याचे काम सुरू आहे.

महा-डीबीटीमुळे नागरिकांना विविध योजनांसाठी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जाण्याची आवश्यकता कमी होणार असून, घरबसल्या किंवा जवळच्या सेवा केंद्रातून योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे. शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्यासोबतच गैरवापराला आळा घालण्यासही या डिजिटल प्रणालीची मदत होत आहे.

आज सुरू करण्यात आलेल्या २९ योजनांमध्ये इतर मागासवर्गीय विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या योजनांचा समावेश आहे. या योजनांचे महा-डीबीटीवर यशस्वीपणे ऑनबोर्डिंग केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागांचे अभिनंदन केले.

महा-डीबीटी 2.0 ची वैशिष्ट्ये

महा-डीबीटी 2.0 मध्ये सिंगल साइन-ऑन, लाईव्ह डॅशबोर्डद्वारे रिअल-टाइम मॉनिटरिंग आणि ‘नो युवर बेनिफिट’ यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. आधार आधारित पडताळणी, एंड-टू-एंड डिजिटल प्रक्रिया आणि पारदर्शक थेट लाभ हस्तांतरणामुळे योजनांची मंजुरी व लाभ वितरण प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.

नागरिककेंद्री डिजिटल सुधारणांना गती देऊन शासकीय योजनांचा लाभ कमीत कमी अडचणींसह पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

«
Next
Newer Post
»
Previous
Older Post

No comments:

Leave a Reply