संपर्क :

📞 बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क : 9834502554 | ✉️ E-mail : janvedhnews3@gmail.com 🖇️Instagram : janvedhnews
Theme images by kelvinjay. Powered by Blogger.

मुख्य बातम्या

देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन

देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...

Breaking News

🔴 BREAKING NEWS 👉 जनवेध न्यूजमध्ये आपले स्वागत | ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या | बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8329354008 | ✉️ janvedhnews@gmail.com

Popular Posts

Lifestyle

Sports

Home » नांदेड बातम्या » महसूल » जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, न्यायालय प्रशासन व वनविभागाचा संयुक्त उपक्रम

 लोहा वनपरिक्षेत्रात एकाच वेळी दोन हजार वृक्षांची लागवड



लोहा, दि. 8 ऑगस्ट 2026 : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय प्रशासन, वनविभाग नांदेड आणि तालुका विधी सेवा समिती, लोहा यांच्या संयुक्त विद्यमाने लोहा वनपरिक्षेत्रात शनिवारी एकाच वेळी दोन हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. प्रमुख जिल्हा न्यायाधीश नरेंद्र के. ब्रह्मे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे यांनी प्रास्तविक केले. 

ज़िल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी वृक्षांचे पर्यावरणातील महत्त्व विशद करताना न्यायालयीन प्रशासनाने पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

अध्यक्षीय भाषणात प्रमुख जिल्हा न्यायाधीश नरेंद्र के. ब्रह्मे यांनी वृक्ष हे पर्यावरणाचे आधारस्तंभ असल्याचे सांगितले. वृक्ष वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेत प्राणवायू उपलब्ध करून देतात. त्यामुळे वृक्षलागवडीसोबतच लावलेल्या वृक्षांचे संगोपन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

विशेष म्हणजे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश नरेंद्र के. ब्रह्मे यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्यक्ष सहभाग घेत वृक्षलागवड केली. शेवटचे झाड लागेपर्यंत त्यांनी स्वतः वृक्षारोपण करत पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालून दिला.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपवनसंरक्षक संदीप चव्हाण आणि वनविभागाच्या संपूर्ण पथकाने नियोजन व परिश्रम घेतले. लोहा येथील न्यायाधीश निरंजन चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

कार्यक्रमास नांदेड न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश तसेच इतर न्यायाधीश, जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक व न्यायालयीन व्यवस्थापक, लोहा तालुका न्यायालयातील अधिकारी-कर्मचारी, संत गाडगेबाबा महाविद्यालयातील विद्यार्थी, विधी स्वयंसेवक, लोहा ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमारे 150 ते 200 नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला.

लोहा ग्रामस्थांनी लागवड केलेली सर्व झाडे जगविण्याची व त्यांचे नियमित संगोपन करण्याची ग्वाही दिली. न्यायालयीन प्रशासन, वनविभाग, विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या सहभागातून राबविण्यात आलेला दोन हजार वृक्षांचा हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरला.

«
Next
Newer Post
»
Previous
Older Post

No comments:

Leave a Reply