संपर्क :

📞 बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क : 9834502554 | ✉️ E-mail : janvedhnews3@gmail.com 🖇️Instagram : janvedhnews
Theme images by kelvinjay. Powered by Blogger.

मुख्य बातम्या

देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन

देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...

Breaking News

🔴 BREAKING NEWS 👉 जनवेध न्यूजमध्ये आपले स्वागत | ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या | बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8329354008 | ✉️ janvedhnews@gmail.com

Popular Posts

Lifestyle

Sports

Home » नांदेड » नांदेड बातम्या » नांदेड एलपीजी ग्राहकांनी १५ ऑगस्टपूर्वी ई-केवायसी पूर्ण करावी

*नांदेड जिल्ह्यातील घरगुती गॅस ग्राहकांना जिल्हा प्रशासनाचे आवाहन*


नांदेड, दि. 9 ऑगस्ट 2026 : नांदेड जिल्ह्यातील सर्व घरगुती एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांनी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया १५ ऑगस्ट २०२६ पूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले आहे. गॅस पुरवठा नियमित व सुरळीत राहण्यासाठी ग्राहकांनी विहित मुदतीत ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.

गॅस एन्सीवर ई-केवायसी कशी करावी?

ग्राहकांनी आपल्या संबंधित गॅस एजन्सीला आधार कार्ड व गॅस पासबुक घेऊन भेट द्यावी. एजन्सीवर बायोमेट्रिक अर्थात अंगठ्याच्या ठशाद्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येईल.

मोबाईल ॲपद्वारेही ई-केवायसीची सुविधा

ग्राहकांना घरबसल्या संबंधित गॅस कंपनीच्या अधिकृत मोबाईल ॲपद्वारेही ई-केवायसी करता येणार आहे. यासाठी IndianOil One, Bharatgas किंवा HP Pay यांसारख्या अधिकृत ॲपचा वापर करून आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनद्वारे प्रक्रिया पूर्ण करता येईल.

ई-केवायसीची प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणत्याही प्रकारचे शुल्क देऊ नये. अंतिम मुदतीच्या वेळी होणारी गर्दी व धावपळ टाळण्यासाठी ग्राहकांनी १५ ऑगस्टपूर्वीच ई-केवायसी पूर्ण करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

«
Next
Newer Post
»
Previous
Older Post

No comments:

Leave a Reply