नांदेड, दि. २ सप्टेंबर : कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून उत्पादन खर्च व वेळ कमी करण्यासोबतच शेतकऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ड्रोनद्वारे पीक फवारणी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. ड्रोनच्या माध्यमातून पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत कमी वेळेत मोठ्या क्षेत्रावर फवारणी करता येते. कीटकनाशके, बुरशीनाशके व अन्य कृषी निविष्ठांची फवारणी करताना शेतकऱ्यांचा औषधांशी थेट संपर्क कमी होत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ड्रोन फवारणी उपयुक्त ठरते. तसेच शेतात प्रत्यक्ष प्रवेश करण्याची आवश्यकता कमी झाल्याने पिकांची होणारी नासधूस टाळता येते. ऊस, कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा, गहू, भाजीपाला, फळबाग तसेच वाढलेली व दाट पिके यांसाठी ड्रोन फवारणी उपयुक्त असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. ड्रोनसाठी मिळणार लाखोंचे अनुदान कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत किसान ड्रोन या घटकासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना ड्रोनच्या मूळ किमतीच्या ५० टक्के किंवा कमाल ५ लाख रुपये, तर सर्वसाधारण व बहुभूधारक शेतकऱ्यांना मूळ किमतीच्या ४० टक्के किंवा कमाल ४ लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल, तेवढे अनुदान देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. फवारणीपूर्वी नियमांचे पालन आवश्यक ड्रोनद्वारे फवारणी करताना संबंधित पिकासाठी शिफारस केलेली कृषी निविष्ठा, योग्य प्रमाण आणि शिफारस केलेली फवारणीची वेळ यांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे ड्रोन फवारणीचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ड्रोन चालविण्याबाबत प्रमाणपत्रही देण्यात येते. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
संपर्क :
मुख्य बातम्या
देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन
देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...
Breaking News
🔴 BREAKING NEWS
Home Link: Nanded महाराष्ट्र Link: /search/label/महाराष्ट्र देश Link: /search/la
Popular Posts
-
खानदेशात केळीची आवक वाढली; निर्यातक्षम केळीला २२०० रुपयांपर्यंत दर खानदेश : मागील पाच ते सात दिवसांपासून खानदेशात केळीच्या आवकेत वाढ झाली ...
-
नांदेड जिल्ह्यातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा; पात्र रुग्णांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन नांदेड : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्ग...
-
देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...
Menu Footer Widget
Lifestyle
Sports
Home
»
»Unlabelled
»
ड्रोनद्वारे पीक फवारणीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटीवर अर्ज करावेत
जनवेध न्यूज 's Admin
We are.., This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
Subscribe to:
Post Comments (Atom)




No comments: