संपर्क :

📞 बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क : 9834502554 | ✉️ E-mail : janvedhnews3@gmail.com 🖇️Instagram : janvedhnews
Theme images by kelvinjay. Powered by Blogger.

मुख्य बातम्या

देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन

देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...

Breaking News

🔴 BREAKING NEWS 👉 जनवेध न्यूजमध्ये आपले स्वागत | ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या | बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8329354008 | ✉️ janvedhnews@gmail.com

Popular Posts

Lifestyle

Sports

Home » नांदेड बातम्या » शाळेतच १० वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचाराचा आरोप; नांदेडमध्ये खळबळ

 शाळेतच १० वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचाराचा आरोप; नांदेडमध्ये खळबळ 


नांदेड : शहरातील एका शाळेत १० वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित शाळेच्या ५० वर्षीय मुख्याध्यापकाविरुद्ध गंभीर आरोप करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुलीसोबत गैरकृत्य झाल्यानंतर तिने आरडाओरड केल्याने हा प्रकार उघडकीस आला. घटनेनंतर मुलीच्या पालकांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मुख्याध्यापकाविरुद्ध पोक्सो कायद्यासह ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी संशयित मुख्याध्यापकाला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी दिली.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यात अवघ्या तीन दिवसांत अल्पवयीन मुलींशी संबंधित दुसरी घटना समोर आल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही, याची तपासणी करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

«
Next
Newer Post
»
Previous
Older Post

No comments:

Leave a Reply