संपर्क :

📞 बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क : 9834502554 | ✉️ E-mail : janvedhnews3@gmail.com 🖇️Instagram : janvedhnews
Theme images by kelvinjay. Powered by Blogger.

मुख्य बातम्या

देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन

देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...

Breaking News

🔴 BREAKING NEWS 👉 जनवेध न्यूजमध्ये आपले स्वागत | ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या | बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8329354008 | ✉️ janvedhnews@gmail.com

Popular Posts

Lifestyle

Sports

Home » Maharashtra » Marathi News » महिला मेळावा, ‘महिला मॉल’ आणि कामकाजी महिलांसाठी वसतिगृहाबाबत महत्वपूर्ण चर्चा

 महिला सक्षमीकरणासाठी महापालिकेचा पुढाकार



नांदेड, दि. २४ ऑगस्ट २०२६ : नांदेड महानगरपालिकेच्या शिक्षण, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सौ. सदिच्छा सोनी पाटील यांच्या सूचनेनुसार महापालिका मुख्यालयात दीनदयाळ अंत्योदय योजना–राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) अंतर्गत कार्यरत महिला शहर स्तर संघ व वस्ती स्तर संघांच्या अध्यक्ष व सचिवांची महत्वपूर्ण बैठक सोमवारी पार पडली.

सकाळी ११ वाजता झालेल्या या बैठकीस नांदेड शहरातील विविध महिला बचत गटांच्या प्रतिनिधींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आगामी काळात शहरात भव्य महिला मेळावा आयोजित करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या मेळाव्याचे स्वरूप, विविध उपक्रम आणि कार्यक्रमाची रूपरेषा याबाबत महिला प्रतिनिधींनी आपली मते मांडली.

महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तू व सेवांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘महिला मॉल’ सुरू करण्याच्या प्रस्तावावरही महत्वपूर्ण विचारविनिमय करण्यात आला. तसेच बचत गटातील महिलांचे कौशल्य, ज्ञान आणि व्यवसायविषयक अनुभव वाढविण्यासाठी विशेष ‘महिला बचत गट अभ्यास दौरा’ आयोजित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

शहरात नोकरी व कामानिमित्त राहणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा आणि सोयी-सुविधांचा विचार करून कामकाजी महिलांसाठी वसतिगृह सुरू करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. महिला बचत गटांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी जाणून घेत त्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या नाविन्यपूर्ण मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

बैठकीस महापालिकेचे प्रकल्प व्यवस्थापक चंद्रकांत कदम, प्रविण मगरे, श्रीमती सोनी सोनकांबळे, श्रीमती रेणुका केंद्रे (अध्यक्ष, रमाई CLF), श्रीमती अनुराधा मठपती (अध्यक्ष, निर्भया CLF), रजिया बेगम, रंजना कांबळे, गोदावरी गोडबोले, सुनंदा एडके, ज्योती साबळे (व्यवस्थापिका, CLC) यांच्यासह विविध महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.

महिला बचत गटांच्या प्रतिनिधींच्या सक्रिय सहभागामुळे बैठक उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडली. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबतच त्यांच्या सुरक्षितता, कौशल्यविकास आणि व्यवसायवृद्धीसाठी महापालिका स्तरावर विविध उपक्रम राबविण्याच्या दिशेने या बैठकीला महत्वपूर्ण मानले जात आहे.

«
Next
Newer Post
»
Previous
Older Post

No comments:

Leave a Reply