संपर्क :

📞 बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क : 9834502554 | ✉️ E-mail : janvedhnews3@gmail.com 🖇️Instagram : janvedhnews
Theme images by kelvinjay. Powered by Blogger.

मुख्य बातम्या

देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन

देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...

Breaking News

🔴 BREAKING NEWS 👉 जनवेध न्यूजमध्ये आपले स्वागत | ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या | बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8329354008 | ✉️ janvedhnews@gmail.com

Popular Posts

Lifestyle

Sports

Home » India News » साखर संकटाचे सावट; निर्यातदार भारतावर आयातीची वेळ, दरवाढीने ग्राहकांची चिंता वाढली

साखर दरवाडीची कारणे, निर्यातदार भारतावर आयातीची वेळ, दरवाढीने ग्राहकांची चिंता वाढली

नवी दिल्ली : सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच देशातील साखरेच्या वाढत्या दरांनी ग्राहकांची चिंता वाढवली आहे. साखरेच्या दरवाढीमागे इथेनॉल उत्पादन हे प्रमुख कारण असल्याची चर्चा होत असली, तरी केंद्र सरकारने इथेनॉलमुळे साखरेच्या दरात वाढ झाल्याचे नाकारले आहे. मात्र, देशांतर्गत उत्पादनात झालेली घट आणि वाढलेली मागणी यामुळे साखरेच्या बाजारावर दबाव निर्माण झाला आहे. चालू हंगामात देशातील साखरेचे उत्पादन सुमारे ३०६ लाख मेट्रिक टन राहण्याचा अंदाज आहे. यापूर्वी ऊस उत्पादक राज्यांकडून सुमारे ३४३ लाख मेट्रिक टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन हे साखर बाजारातील महत्त्वाचे कारण ठरत आहे. दरम्यान, उसाच्या पिकावर रेड रॉट आणि टॉप बोरर यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यातच वेळेआधी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतांमध्ये पाणी साचून उसाचे मोठे नुकसान झाले. परिणामी ऊस उपलब्धतेवर आणि आगामी साखर उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सरकारच्या मते, साखरेच्या दरवाढीमागे केवळ उत्पादनातील घट कारणीभूत नाही. सणासुदीपूर्वी वाढलेली देशांतर्गत मागणी, हवामानामुळे पिकांचे नुकसान, जागतिक साखर पुरवठ्यातील घट तसेच काही घटकांकडून होणारी सट्टेबाजी आणि साठेबाजी यांचाही बाजारावर परिणाम होत आहे. विशेष म्हणजे, जगातील प्रमुख साखर निर्यातदार देशांपैकी एक असलेल्या भारताला परिस्थितीनुसार साखर आयातीचा पर्याय स्वीकारावा लागू शकतो. त्यामुळे देशांतर्गत साखरेच्या दरांसोबतच जागतिक साखर बाजारातील पुरवठा आणि किमतींच्या गणितावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, केंद्र सरकारने देशात सध्या पुरेसा साखर साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले असून, ऑक्टोबरमध्ये नवीन गाळप हंगाम सुरू होईपर्यंत देशांतर्गत मागणी भागवण्यासाठी साठा पुरेसा असल्याचा दावा केला आहे. साखरेच्या दरांवर पुढील काळात उत्पादन, मागणी, आयात-निर्यात धोरण आणि नवीन गाळप हंगामातील ऊस उपलब्धता यांचा मोठा प्रभाव राहणार आहे.

«
Next
Newer Post
»
Previous
Older Post

No comments:

Leave a Reply