मुक्ताई संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप
धाराशिव, दि. ८ ऑगस्ट २०२६ : मुक्ताई बहुउद्देशीय
सामाजिक संस्थेच्या वतीने कुमारी रिपाई सोमनाथ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत नूतन प्राथमिक विद्यामंदिर, धाराशिव येथील इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व तसेच खाऊ वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे व समाजाप्रती उत्तरदायित्वाची भावना जोपासणे हा होता. कार्यक्रमास वर्गशिक्षक माळी सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.
यावेळी विद्यार्थ्यांमध्ये शालेय साहित्याचे उत्साहपूर्ण वातावरणात वितरण करण्यात आले. मुक्ताई बहुउद्देशीय सामाजिक संस्था भविष्यातही शिक्षण, सामाजिक सेवा व जनकल्याणासाठी असे विविध उपक्रम सातत्याने राबवत राहणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड अक्षय गायकवाड मुकेश मोठे सुरेश कांबळे इत्यादी उपस्थित होते




No comments: