संपर्क :

📞 बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क : 9834502554 | ✉️ E-mail : janvedhnews3@gmail.com 🖇️Instagram : janvedhnews
Theme images by kelvinjay. Powered by Blogger.

मुख्य बातम्या

देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन

देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...

Breaking News

🔴 BREAKING NEWS 👉 जनवेध न्यूजमध्ये आपले स्वागत | ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या | बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8329354008 | ✉️ janvedhnews@gmail.com

Popular Posts

Lifestyle

Sports

Home » »Unlabelled » केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली उत्तराखंडच्या राज्यपालांची भेट*

 #RAMDAS ATHAWALE#


देहरादुन दि. 08 -  उत्तराखंडचे राज्यपाल महामहिम गुरमित सिंह यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी उभयतांमध्ये दीर्घ चर्चा झाली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समता, स्वांतत्र, बंधुत्वाचे विचार, त्यांनी दिलेले भारतीय संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपल्याला प्रचंड श्रध्दा आणि अभिमान असल्याचे मत यावेळी राज्यपाल गुरमित सिंह यांनी ना. रामदास आठवले यांच्याकडे व्यक्त केले.  

त्यांनी ना. रामदास आठवले यांची वक्तृत्वशैली अनोखी आहे. संसदेत आणि अन्य ठिकाणी त्यांनी केलेली भाषणे आपण आवडीने ऐकली आहेत. त्यांची अनोखी भाषणशैली आपल्याला आवडते. ना. रामदास आठवले यांचा प्रचंड दीर्घ प्रवास आहे. त्यांचा जीवन प्रवास तो त्यांनी आत्मचरित्र स्वरुपात लिहावा असा सल्ला राज्यपाल गुरमित सिंह यांनी ना. रामदास आठवले यांना दिला. राज्यपालांनी लिहलेली दोन पुस्तकेही त्यांनी ना. रामदास आठवले यांना भेट दिली. यावेळी बोलतांना त्यांनी  आपले वडील सुध्दा सुभेदार होते.  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडिल सुध्दा सुभेदार होते. आपल्याला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल प्रचंड श्रध्दा असल्याचेही राज्यपाल गुरमित सिंह यांनी सांगितले. आपल्या संघर्षमय जीवनावर पुस्तके लिहिली गेली आहेत का अशी विचारणा राज्यपालांनी आठवलेंना केली.


हेमंत रणपिसे  

प्रसिध्दीप्रमुख

«
Next
Newer Post
»
Previous
Older Post

No comments:

Leave a Reply